१) संस्थेतील सर्व सभासदानी आपल्या वाहनावर संस्थेचा स्टिकर लावणे बंधनकारक आहे.
२) ज्या सभासदांच्या दुचाकी व चार चाकी वाहने असतील त्यांनी त्या वाहनाची आर सी बुकची प्रत कार्यालयात जमा करावी व वाहनाचे नवीन स्टीकर कार्यालया मधून घेऊन जावे, तसेच संस्थेत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या व्यक्तींना दुचाकी वाहना करिता नवीन स्टीकर बनविलेला आहे तो कार्यालयांमधून घेऊन जावे. (सदनिका धारकांनी त्याची कल्पना भाडोत्रीला द्यावी, तसेच भाडोत्रीच्या दुचाकी वाहन पार्क करण्याकरिता बिल्डिंग नंबर २ अ ब च्या मागे जागा करण्यात आलेली आहे.) वाहने प्रवेशद्वारा समोर किंवा वळणावर पार्क करू नये.
३) ज्या सभासदांनी आपली सदनिका/गाळे भाडेतत्वावर दिल्यास त्याची सह दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्टर प्रत, पोलिस व्हेरीफिकेशन सहित नोंद करुन संस्थेत जमा करावी.
४) ज्या सभासदांनी अजूनही आपल्या शेअर सर्टिफिकेट ची झेरॉक्स प्रत, नॉमिनेशनचे फॉर्म व इतर ट्रान्सफर संबंधित कागदपत्रे कार्यालयात जमा केली नसतील तर ती जमा करावी त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
५) सभासदांनी सदनिका / व्यावसायिक गाळे भाडेतत्त्वावर दिले आहे अशा सभासदांनी आपल्या राहाण्याचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी संस्थेत सादर करावा. (जर बदल झाला असेल तर).
६) सभासदांना विनंती आहे की, मासिक देय रक्कम महिन्याच्या २६ तारखेच्या आत भरावी.
७) सभासदांनी आपल्या घरातील अडगळीचे सामान उदाहरणार्थ थर्माकोल, ट्यूबलाईट, काचेच्या बाटल्या, जुने फर्निचर इत्यादी वस्तूंची विल्हेवाट स्वतः लावावी. ठाणे महानगरपालिकेच्या घंटागाडी कामगार व आपल्या संस्थेतील सफाई कामगार यांना वरील वस्तू उचलण्यास सक्त मनाई केली आहे.