jaitrimurti.com

संस्थेविषयी माहिती

जय त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

जय त्रिमूर्ति को-ऑप. हाऊसिंग सोसायटी या संस्थेची स्थापना १२ऑगस्ट, १९७६ रोजी झाली. ही जागा त्यावेळी एन. एम. एम. कामगार को-ऑप. हाऊसिंग सोसायटी या संस्थेकडून कायदेशीररित्या विकत घेण्यात आली. या संस्थेचा परिसर हा १०३३२.७७ चौ. मिटर म्हणजेच १,११,२२०.९० चौ. फुट एवढ्या जागेत पसरलेला आहे. 

या संस्थेच्या आवारात एकूण ६ इमारती आहेत व  सर्व इमारती मिळून १४ विंग आहेत.  संस्थेमध्ये २२० सदनिका आहेत व १८ व्यावसायिक गाळे आहेत.  एक व्यवसायिक गाळा व सदनिका ही संस्थेच्या मालकीची आहे. अशाप्रकारे एकूण २४० सदनिका व गाळे या परिसरात आहेत.

ह्या परिसराची जागा ही कळव्यातील महत्वाच्या जागांपैकी एक आहे. या जागेपासून सर्व ठिकाणे जसे की  रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, रिक्शा स्टँड, मार्केट, शाळा, हॉस्पिटल, मंदिरे, जीम, क्रीडा संकुल, स्विमिंग पूल, सिनेमा गृह, नाट्य गृह, ठाणे, मुंबई, नवी मुंबई कोनेक्टीविटी, राजकीय महामार्ग ०.५ ते १ किलोमीटर अंतरावर आहेत. हि बाब ह्या जागेला विशेष महत्व प्राप्त करून देते.

गेली ४५ हून अधिक वर्षे या परिसरातील सर्व सभासद आणि त्यांचे कुटुंबीय एकोप्याने, शांततेने आणि समाधानाने या वास्तूत रहात आहेत. सर्व सभासद आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र येऊन सर्व सण व उत्सव आनंदाने साजरे करतात. लहान आणि तरुण मुलांसाठी वेग वेगळे क्रीडा महोत्सव या परिसरात राबविले जातात व त्यामध्ये सर्वजण सहभागी होतात.

या परिसरातील २५ जानेवारीला होणारा साई उत्सव हा सर्व कळवेकरांचे श्रद्धा स्थान आहे.  सर्व कळवेकर आवर्जून या उत्सवाला भेट देतात व साईबाबांचा आशीर्वाद घेतात. तसेच या परिसरात होणारा त्रिमूर्ति प्रीमियर लीग हा क्रिकेट चा क्रीडा महोत्सव हा या परिसरातील एक आकर्षण आहे. ज्यामध्ये दूर दूरचे कित्येक संघ आपला सहभाग नोंदवतात.

आज या संस्थेला ४५ हून अधिक वर्षे झाली असल्या मुळे, तसेच काळाची गरज असल्या कारणाने सर्व सभासद एकत्र येवून आणि काही माफक अपेक्षा समोर ठेवून या संस्थेचा पुनर्विकास करण्यासाठी वाटचाल करीत आहेत. त्यात त्यांना यश मिळो हिच साई चरणी प्रार्थना.

श्री. अनिल श्रीपत राणे
अध्यक्ष

प्रिय सभासद बांधव,

जय त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाच्या प्रवासात आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
आपल्या संस्थेच्या पुनर्विकासाची प्रक्रिया ही केवळ नवीन इमारत उभारण्याचा प्रकल्प नसून, आपल्या सर्वांच्या सुरक्षित, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण भविष्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वास, कायदेशीर नियमांचे पालन आणि सभासदांचा सक्रिय सहभाग हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठीसोसायट्यांनीसंकेतस्थळाद्वारे कागदपत्रे, सूचना व माहिती सभासदांपर्यंत उपलब्ध करून देण्याची पद्धतही व्यापकपणे स्वीकारली जात आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून पुनर्विकासाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या सूचना, सभा नोटिसा ठराव, आवश्यक कागदपत्रे, प्रगती अहवाल आणि इतर अद्ययावत माहिती वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल.
त्यामुळे प्रत्येक सभासदाला अचूक व अधिकृत माहिती एकाच ठिकाणी सहज मिळू शकेल. आपल्या सर्वांचे सहकार्य, सूचना आणि विश्वास यांच्या बळावर हा पुनर्विकास प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होईल, असा मला ठाम विश्वास आहे.
चला, आपण सर्वजण एकत्रितपणे आपल्या संस्थेचे उज्ज्वल, सुरक्षित आणि आधुनिक भविष्य घडवूया.
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

आपला विश्वासू,
श्री. अनिल श्रीपत राणे
अध्यक्ष
जय त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था

सौ. विद्या नंदकुमार राऊत
सचिव

आदरणीय सभासद बंधू-भगिनींनो,

जय त्रिमूर्ती को-ऑप. हौ. सोसायटीच्या अधिकृत Website वर आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
ही Website म्हणजे आपल्या सर्वांच्या सामायिक घराची माहिती देणारा एक छोटासा डिजिटल दरवाजा आहे. पारदर्शकता, माहितीची सहज उपलब्धता आणि सभासदांमधील संवाद अधिक दृढ करणे हा या Website चा मुख्य उद्देश आहे.
आज आपली सोसायटी एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे – पुनर्विकास. जुन्या आठवणी जपून, नवीन स्वप्नांचा वेध घेणारा हा प्रवास आहे. या प्रवासात कार्यकारिणी म्हणून आम्ही प्रत्येक निर्णय हा पारदर्शकपणे आणि सर्वांच्या भल्यासाठी घेऊ, असा शब्द देतो.
आपल्या सूचना, तक्रारी आणि सहकार्यामुळेच सोसायटी अधिक सुदृढ होईल. कृपया ही Website नियमितपणे पहा आणि आपले मत आमच्यापर्यंत पोहोचवा.
चला तर, एकत्र येऊन आपल्या “त्रिमूर्ती” ला अधिक उंचीवर घेऊन जाऊया.

आपली विश्वासू, 
सौ. विद्या राऊत 
सचिव 
जय त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था

सौ. नेहा सुनील इंदुलकर
खजीनदार

प्रिय सभासद बंधू आणि भगिनींनो,

आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ‘जय त्रिमूर्ती को-ऑप.हौसिंग सोसायटी’ च्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.
एक खजिनदार म्हणून, आपल्या सोसायटीच्या आर्थिक शिस्तीची आणि पारदर्शकतेची जबाबदारी सांभाळताना मला अत्यंत आनंद होत आहे. आमचा मुख्य उद्देश आपल्या सोसायटीचा निधी सुरक्षित ठेवणे, वेळेवर देखभाल खर्च योग्य प्रकारे करणे आणि भविष्यातील गरजांसाठी आर्थिक नियोजन करणे हा आहे.
आम्ही सर्व सभासदांना विनंती करतो की, सोसायटीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी आपले मेंटेनन्स बिल दरमहा वेळेवर भरा. आम्ही नेहमीच आपल्या पैशांचा योग्य हिशेब ठेवण्यास कटिबद्ध आहोत.
सहकार्याच्या आणि विश्वासाच्या भावनेतून वाटचाल करणाऱ्या आपल्या सोसायटीच्या पुनर्विकासाचा टप्पा आता प्रत्यक्षात सुरू झालेला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची गोष्ट आहे.
एक खजिनदार म्हणून, मी तुम्हाला पूर्णपणे आश्वस्त करू इच्छिते की, पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडेल. जुन्या इमारतीचे आधुनिकीकरण करताना, आपल्या सर्वांच्या हक्कांच्या घरांचे भविष्य सुरक्षित करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
ही आपली सर्वांची मिळून झालेली गुंतवणूक आहे. या प्रवासात तुमची साथ आणि सहकार्य आम्हाला सातत्याने लाभेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
सहकार्याबद्दल धन्यवाद!

आपली नम्र,
सौ. नेहा सुनील इंदुलकर
खजीनदार
जय त्रिमूर्ती को-ऑप. हौसिंग सोसायटी

Scroll to Top