jaitrimurti.com

७९अ मार्गदर्शक तत्वे

पुनर्विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने ७९ (अ) अंतर्गत दिलेली मार्गदर्शक तत्वे

१) सोसायटीच्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यासाठी सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा बोलावणेयासाठी सभासदांचा अर्ज येणे.

२) पुनर्विकास या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावणे

३) इमारतीच्या पुनर्विकासाबाबत सभासदांनकडून लेखी सूचना प्राप्त करणे

३) इमारतीच्या पुनर्विकासाबाबत सभासदांनकडून लेखी सूचना प्राप्त करणे

४) विशेष सर्वसाधारण सभेत पि. एम. सी. / आर्किटेक्ट यांची निवड करण्याबाबत निर्णय घेणे व पुनर्विकासाच्या पुढील वाटचालीची रूपरेषा ठरविणे

५) सर्व सभासदांना सभेचे इतिवृत्त देणे व एक प्रत रजिस्टर कार्यालयात पाठवविणे

६) पि. एम. सी. / आर्किटेक्ट यांची निवड करणे व त्यांना नियुक्ती पत्रक देणे

७) पि. एम. सी. / आर्किटेक्ट यांनी प्रारंभीक कामे करणे व प्रकल्प अहवाल सादर करणे

८) पुनर्विकास प्रकल्प अहवाल मिळाल्यानंतर त्यावर चर्चा करून, सभासदांच्या सूचना विचारात घेवून त्याला अंतिम स्वरूप देणे व विकसकाची निवड करण्याच्या प्रक्रिये बाबत निर्णय घेणे.

९) विकासक म्हणून प्राप्त झालेल्या निविदाकारांची यादी प्रसिद्ध करणे

१०) विकासकाची निवड करण्यासाठी विशेष सर्व साधारण सभा आयोजित करणे व त्यामध्ये विकसकाची निवड करणे

११) विकासकाची निवड झाल्यावर त्यांच्या बरोबर विकास करार अंमलात आणणे

१२) सोसायटीचा कोणताही समिती सदस्य किंवा पदाधिकारी विकासक किंवा विकासकाचा नातेवाईक नसावा.

१३) महानगरपालिका / सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेले इमारतीचे आराखडे सर्वसाधारण सभेसमोर माहितीसाठी सादर करावेत आणि जर कोणत्याही सभासदाला मंजूर कागदपत्रांच्या प्रती हव्या असतील तर त्यांनी त्यासाठी सोसायटीकडे अर्ज सादर करावा आणि समितीला आवश्यक शुल्क आकारून माहिती देणे बंधनकारक असेल.

Scroll to Top