पुनर्विकास प्रकल्पाची माहिती
अनु. क्र.
कामाचे वर्णन
सद्यस्थिती
१
पुनर्विकासासाठी सभेचे आयोजन करण्यासाठी सभासदान कडून अर्ज प्राप्त होणे
११/१०/२०२५ रोजी अर्ज प्राप्त झाला
२
कोरमपूर्तते साठी विशेष सर्व साधारण सभेचे आयोजन करणे
९/११/२०२५ रोजी सभेचे आयोजन करण्यात आले. सभेमध्ये कोरम पूर्ण झाला व पुनर्विकास प्रक्रिया राबविण्यासाठी सभासदांची संमती मिळाली.
3
पि. एम. सी. निवडीसाठी निविदा प्रक्रियेची तयारी करणे (फॉर्म बनविणे, वर्तमानपत्रात जाहिरात देणे व नावाजलेल्या पि. एम. सी. कडून टेंडर मागविणे)
०१/०१/२०२६ ते १८/०२/२०२६ पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली.
४
आलेल्या निविदा ची माहिती निविदा प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी संस्थेच्या नोटिस बोर्डावर जाहीर करणे
१८/०२/२०२६ रोजी आलेल्या सर्व निविदांची यादी संस्थेच्या नोटिस बोर्डावर जाहीर करण्यात आली.
५
आलेल्या निविदा उघडून त्यांची कामाची गुणवत्ता, आर्थिक परिस्थिती आणि कंपनीची पथ या बाबींवर चाळणी करून उच्चतम ५ निविदा ची निवड करणे
१९/०२/२०२६ रोजी आलेल्या सर्व निविदा उघडण्यात आल्या. ०७/०४/२०२६ पर्यंत सर्व निविदांची तपासणी करून उच्चतम ५ निविदांची निवड करण्यात आली.
६
निवड करण्यात आलेल्या कंपन्यांची कार्यालये व त्यांनी केलेल्या साईट ना भेट देवून त्यांच्या कामाचा दर्जा तपासणे व त्यांना त्यांच्या कंपनीचे प्रेझेंटेशन देण्याची संधि देवून व त्यातून सर्वोत्तम ३ निविदा निवडणे.
१७/०४/२०२६ ते १९/०४/२०२६ या कालावधीत निवड करण्यात आलेल्या कंपन्यांची कार्यालये व त्यांनी केलेल्या साईट ना भेट देण्यात आली. तसेच २१/०४/२०२६ ते २३/०४/२०२६ या कालावधीत त्या ५ पि. एम. सी. चे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले व सर्वोत्तम ३ निविदा निवडण्यात आल्या.
७
पि. एम. सी. निवडीसाठी विशेष सर्व साधारण सभेचे आयोजन करून त्यामध्ये सर्व सभासदांचे मत घेवून एका पि. एम. सी. ची निवड करणे
२६/०४/२०२६ रोजी पि. एम. सी. निवडीची सभा झाली व त्यामधून माहीमतूरा कन्सलटंट प्रायवेट लिमिटेड या पि. एम. सी. ची निवड करण्यात आली.
८
निवड केलेल्या पि. एम. सी. ला नियुक्ती पत्र देवून त्यांना फिजिबिलिटी रीपोर्ट सादर करण्यास सांगणे
०७/०५/२०२६ रोजी पि. एम. सी. यांनानियुक्ती पत्र देण्यात आले. पि. एम. सी. कडून संस्थेच्या जागेच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली. ती कागदपत्रे २८/०५/२०२६ पर्यंत देण्यात आली. त्यामध्ये काही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी पि. एम. सी. कडून १०/०६/२०२६ रोजी करण्यात आली. ती कागदपत्रे त्यांना १६/०६/२०२६ पर्यंत देण्यात आली.
९
पि. एम. सी ने केलेल्या विनंती नुसार जागेची आणि सदनिकांची मोजणी करून घेणे
१८/०७/२०२६ ते २२/०७/२०२६ या कालावधीमध्ये सदनिका व जागेच्या मोजणीचे काम पूर्ण झाले. ०८/०८/२०२६ रोजी सर्वेयेर कडून मोजणी चे रीपोर्ट देण्यात आले होते. परंतु कार्यकरिणीला त्यामध्ये अजून स्पष्टता हवी होती म्हणून त्यांच्याबरोबर १८/०८/२०२६ रोजी सभा घेवून संस्थेच्या जागेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हव्या असणाऱ्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट करून घेतल्या. सर्वेयेर कडून अंतिम रीपोर्ट संस्थेला २२/०८/२०२६ रोजी प्राप्त झाले व २३/०८/२०२६ रोजी ते रीपोर्ट पि. एम. सी. ला पाठविण्यात आले. अशाप्रकारे कार्यकरिणिमार्फत ही पि. एम. सी. कडून आलेली विनंती पूर्ण करण्यात आली.
१०
पि. एम. सी बरोबरचे वर्क कॉंट्रॅक्ट निश्चित करणे
प्रगती पथावर
११
पि. एम. सी. कडून प्रकल्प अहवाल (फिजिबिलिटी रीपोर्ट) संस्थेला प्राप्त होणे व तो सभासदांसमोर सादर करणे.
प्रगती पथावर